माझी पहिली मुलाखत


                         दि ६ सप्टेंबर रोजी माझी पहिली मुलाखत झाली. हुश्श! एक मोठ्ठ दडपण गेलं. खरतर आपली कुणीतरी मुलाखत घेणार आहे हे फिलिंगच खूप वेगळं होत. दि १२ ऑगस्ट २०२० रोजी 'शिवरायांचा आठवावा प्रताप' माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आणि अक्षरश: लोकांच्या पुस्तक घेण्यासाठी त्यावर उड्या पडल्या. इतक्या कि अजून मला माझ्या स्वतःच्या कॉपी मिळू शकल्या नाहीत. एवढं प्रेम एका नवोदित लेखकाला मिळेल हि मी कल्पनाच केली नव्हती पण ज्याने सद्गुरूच बोट पकडून ठेवलंय त्याला तो काहीच कमी पडू देत नाही. 


मग अचानक एक दिवस श्री सन्मान गावकर ह्यांचा मेसेज आला कि उत्कर्ष गोरेगाव ह्या संस्थेतर्फे दर रविवारी एका व्यक्तीची मुलाखत घेतो त्यात आम्हाला तुझी सुद्धा मुलाखत घ्यायची आहे.त्या वेळेला खूप भारी वाटलं पण नंतर जसजसा मुलाखतीचा दिवस जवळ येऊ लागला तस एकदम नर्व्हस वाटायला लागलं. 


असो पण मुलाखत खूप सुंदर झाली. म्हणजे माझ्या अपेक्षे पेक्षा खूप सुंदर झाली. ह्याच श्रेय मी अक्षय राणेला देईन. एका नवख्या व्यक्तीला बोलत कस करायचं ह्यात त्याची खुबी आहे. अतिशय नकळत तो समोरच्याला बोलतं करतो. त्याबद्दल त्याचे मनापासुन आभार!


पुस्तक प्रकाशित झाल्यावर बऱ्याच जणांचे फोन, मेसेजस आले कि कस सुचलं, काय काय केलं, काय स्ट्रगल केला,  हा पुस्तकाचा प्रवास कसा झाला? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी ह्या मुलाखतीमध्ये दिली आहेत. तेव्हा तुम्हाला सुद्धा जर हे प्रश्न असतील तर नक्की पहा. 


पण मुलाखती दरम्यान आलेल्या कमेंट्स, पुस्तकावर आलेले अभिप्राय वाचून आता स्वतःवर जबाबदारी वाढली आहे ह्याची जाणीव झाली. आणि त्याच जबाबदारीच भान ठेऊन यापुढे वागण्याचा प्रयास नक्की करेन!


मुलाखत कुणाची पाहायची राहून गेली असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. 

माझी मुलाखत 

आणि पुस्तक विकत घ्यायचे राहून गेले असल्यास खाली दिलेल्या पुस्तकावर क्लिक करून विकत घेऊ शकता. 




   - केतन सावंत 

=========================================================================

(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)  

Post a Comment

0 Comments