हिंदूंची देवळ पाडण्याचा औंरंगजेबाचा फतवा

काशीचे विश्वनाथाचे मंदिर (स्रोत विकिपीडिया)


                                सर्वधर्म समभाव हि आपल्या भारतभूमीची शिकवण. हेच मूल्यशिक्षण म्हणून आपल्याला शाळेपासून शिकवलं जात पण आपल्या समोर इतिहास कधीच जसा घडला तसा मांडला जात नाही उलटपक्षी जे घडलं नाही तेच सांगितलं जात आणि विविध मार्गानी (चित्र, व्याख्यान) आपल्याला पटवलं जात. पण जेव्हा अशी वक्तव्य करणाऱ्यांना आपण पुरावे मागतो तेव्हा ते धूम ठोकतात कारण पुरावाच नसतो मग दाखवणार काय? पण आज वा सी बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे, ग हा खरे, महा महोपाध्याय दत्तोवामन पोद्दा, राजवाडे, कुरुंदकर अशा आणि अलीकडच्या काळात कार्यरत असलेल्या लोकांनी हा इतिहास आपल्या पर्यंत पोहचावा म्हणून आपल्या जीवाचं रान करत आहेत. 


संपूर्ण भारतात इस्लामचा बावटा लावू पाहणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण बरीच मंडळी करतात हि तीच मंडळी असतात जी छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर आहेत अशी मत मांडतात. सेक्युलरीसमचा भाग वेगळा पण आजच्या भागात आपण बघणार आहोत तो औरंगजेबाचा फतवा. 


(
औरंगजेबाचा फतवा)

 

ह्या फतव्याची तारीख आहे ज्युलियन कालगणनेनुसार ९ एप्रिल १६६९. देवळं पाडण्यासाठी औरंगजेबाने हा फतवा काढला होता. 


इस्लामचा निस्सीम  भक्त बादशाह औरंगजेबला कळले की थत्ता, मुलतान व विशेषकरून बनारसमधे ब्राह्मणांच्या पाठशाळांमधे चुकीची पुस्तके शिकवली जात होती, हिंदू व मुसलमान समाजामधेही त्यांचे शिष्यगण व प्रशंसक होत, जे दूरदेशातून ह्या अभक्तांकडे वाईट गोष्टी शिकण्यासाठी येतात. औरंगजेब बादशाह ज्यांना सगळीकडे इस्लाम स्थापन करायचा आहे, त्यांनी मुघल प्रांतातील सुभेदारांना असे आदेश दिले आहेत की अभक्तांची [हिंदूंची ] देवळे व पाठशाळा पाडून टाकाव्यात व लवकरात लवकर अभक्ताच्ं या [हिंदूंच्या] धर्माच्या सार्वजनिक प्रथा बंद पाडाव्यात. 


मऱ्याठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना अशा बऱ्याच गोष्टी आपल्या निदर्शनास येणारच आहेत त्या तुमच्यापुढे मांडण्याच्या मी यथाशक्ती प्रयत्न करेन. पण आपणही आपला "खरा" इतिहास समजून घ्यायला हवं आणि त्यासाठी अस्सल पुरावे, संदर्भ ग्रंथ यांचं वाचन करायला हवं, अभ्यास करायला हवा.

संदर्भ - 

१) मासिर ए आलामगिरी - भाग -१०, पृष्ठ - ५१ - साकी मुस्तैद खान (भाषांतरीत - सर जदुनाथ सरकार)


२) औरंगजेबाचा हिंदूंचीनदेवळ पाडण्याचा आदेश



  - केतन सावंत 

=========================================================================

(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)  

Post a Comment

0 Comments