कर्ण - सावंत आणि देसाई यांचा





दुर्दम्य वाचून संपली १४ ऑगस्ट रोजी आणि १५ ऑगस्टपासून 'मृत्युंजय' हि शिवाजी सावंत लिखित कादंबरी वाचायला घेतली. त्या आधीच माझी 'रणजित देसाई' यांनी लिहिलेली 'राधेय' हि छोटेखानी कादंबरी वाचून झाली होती त्यामुळे मृत्युंजय वाचायला घेताना थोडा साशंकच होतो. 

 

राधेय आणि मृत्युंजय ह्या दोन कादंबऱ्यांबद्दल लहानपणापासून ऐकलं होत. मुळात एकाच व्यक्तिरेखेवर दोन कादंबऱ्या का हा प्रश्न होता पण प्रत्येक लेखकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे राधेय वाचून झाल्यावर टिळक वाचले आणि मग मृत्युंजय हाती घेतलं. असो शिवाजी सावंत ह्यांची ह्या आधीही काही पुस्तक वाचली होती त्यामुळे त्यांच्या लिखाणाशी आता बऱ्यापैकी ओळख झाली आहे. 


माझं मत विचारलं तर राधेय आणि मृत्युंजय ह्या दोन्ही ठिकाणी कर्णावर अन्याय झाला हेच दाखवलं आहे. पण प्रत्यक्षात तस झालंय का? ह्यासाठी आपल्याला महाभारत वाचण गरजेचं आहे. कुठलीही कादंबरी लिहिताना त्यात कथा रंगवण्यासाठी त्यात नवीन पात्र उभी करावी लागतात तशीच काही घटना मांडाव्या लागतात. कधी नायक, नायिका ह्यांना वेगवेगळ्या पद्धतींनी वाचकांसमोर मांडलं जात. पण शेवटी ह्या कादंबऱ्या म्हणजे काहि खरा इतिहास नव्हे अथवा सत्य घटना नव्हे. पण ह्या कादंबऱ्या तुम्हाला इतिहासाची गोडी निर्माण करण्यात महत्वाचा वाटा उचलतात एवढं मात्र नक्की. शिवाजी सावंत ह्यांनी लिहिलेला कर्ण मला त्यातल्या त्यात उजवा वाटतो कारण त्यांच्या कादंबरीत बऱ्याच शब्दांची ओळख होते. तसेच कर्णाचे चाक कुठे रुतले, तो कुठे उभा राहून दानधर्म करायचा अशा बऱ्याच जागांचे त्यांनी चित्र पुस्तकात दिले आहेत. ते पाहून एक वेगळा आनंद आहे. जवळपास ५००० वर्षांपूर्वी घडून गेलेल्या महानाट्याच्या अवशेषांचा काही भाग पुस्तकरूपाने का होईना पण आपल्या जवळ आहे ह्याच समाधान आहे. 


शेवटी कोणी काय वाचायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण आवड म्हणून वाचायचं असेल तर ह्या दोन कादंबऱ्या एकदा तरी वाचायलाच हव्यात. तुम्ही त्या खाली दिलेल्या चित्रावर क्लिक करून तुम्ही त्या विकत घेऊ शकता. 

 



 

   - केतन सावंत 

=========================================================================

(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)  

Post a Comment

0 Comments