आजचा लेख थोडा मोठा आहे पण नक्की वाचाव्या अशा काही गोष्टी दिल्या आहेत. जेम्स डग्लस हा आपल्या इतिहासात होऊन गेलेला इंग्रज सरकारातील असा व्यक्ती होता ज्यांनी आपल्या भारताच्या इतिहासाबद्दल बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.
इतिहासाचा अभ्यास करताना काही जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने वाचताना आनंद मिळतो. जेव्हा आपल्या राजाच्या पराक्रमाबद्दल जेव्हा शत्रू आणि इतर लोक लिहून ठेवतात तेव्हा ते वाचताना कोण आनंद मिळतो म्हणून सांगू. पण एक खंत कायम असते ती म्हणजे आपला इतिहास आपण लिहून ठेवलाच नाही. किंवा आपण लिहिला असेल तर जितका हवं तितका नाही. ह्याबाबतीत इंग्रजांना खरच चांगली सवय होती. (आता मी इंग्रजांचं उदात्तीकरण करत नाही पण जी गोष्टी चांगली आहे त्याला चांगलं म्हणतोय इतकंच). बहुधा नंतरच्या काळात म्हणजे स्वराज्याच्या धामधुमीच्या काळात (थोरल्या छत्रपती आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यात जो गोंधळ चालू होता आणि त्यानंतर इंग्रजांकडे भारताचा ताबा आला त्यावेळी त्यांनी गडांची मोडतोड केली तेव्हा बऱ्याच गोष्टी उध्वस्त झाल्या त्यातच हि कागदपत्र नष्ट झाली असणार. असो तरी जे मिळतंय त्यातून आनंद मिळतोय आणि तितक्यावरच समाधान न मानता अजून काही नवीन गोष्टी सापडतील या शोधात आहे.
1)Khafi Khan who was much about Raigarh Sivajis principal residence says - The country around may be considered a specimen of hell, for it is hilly and stony, and water is very search" -
Ref - Bombay & Western India Vol (1) Pg - 333
by James Douglas
खाफीखान ज्याला रायगड म्हणजे शिवाजी राजांच निवासस्थानाबद्दल माहिती होती तो असं म्हणतो - हा भाग हणजे नरक आहे, संपूर्णपणे दगड आणि टेकड्यांनी भरलेला, जिथे पाण्याचंसुद्धा दुर्भिक्ष आहे. (रायगडावर ११ तलाव आणि ८४ पाण्याची टाकी आहेत. त्यातले कित्तेक तलाव दुष्काळातसुद्धा आटत नाही.)
2)When he had finished the fortification of Raygarh, he one day called an assembly of the people and held out a bag of gold & a bracelet worth Rs. 500 as a reward to any man who accomplished the ascent in any way except through the gate he had constructed, and without rope or ladder. A Mahar ascended, planted the flag, then quickly descended and made his obeisance to Sivaji. the man received the rewards in presence of the assembly and was set at liberty. We need not add that the way by which he ascended was closed.
Ref - Bombay & Western India Vol (1) Pg - 337
by James Douglas
रायगडचं बांधकाम जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याने (शिवाजी राजांनी) एक दिवशी दरबार भरवला एका बाजूला त्यांच्या सोन्याची थैली आणि कड होती ज्याची किंमत तेव्हा ५०० रुपये होती आणि त्यांनी जाहीर केला कि जो कोणी किल्ल्याचा एक भाग (कुठला तो नोंद केला नाही) सगळ्यात जलद गतीने चढून जाऊन त्यावर ध्वज लावून परत येईल त्याला हे इनाम मिळेल. एका व्यक्तीने ते पूर्ण केल आणि त्याला ते इनाम मिळालं पण नंतर राजांनी ज्या मार्गाने तो माणूस जाऊन आला तो बंद करून टाकला.
आता ह्या गोष्टीला काहीही आधार नाही. कुठल्याही इतर साधनात याबद्दल उल्लेख नाही. पण सहज म्हणून वाचायला हा परिच्छेद इथे दिला.
3)His place in history may be gathered from these words of Aurangzeb, emperor of Delhi, his greatest enemy, who spent twenty years in the dekhan in the vain endeavor to subdue him and those who came after him:-
"He was a great captain, and the only one who has had the magnanimity to raise a new kingdom while I have been endeavouring to destroy the ancient sovereignties of India. My armies have been employed against hum for nineteen years and nevertheless his state has always been increasing"
Bombay & western India pg 346
James Douglas
आता इथे खूप छान गोष्ट लेखकाने सांगितली आहे. तो म्हणतो - त्यांचं (शिवाजी राजांच) स्थान हे इतिहासात औरंगजेबाच्या शब्दांनी भरलेलं आहे. (औरंगजेबाशी राजांचा कायम संबंध आला असं लेखकाला म्हणायचं आहे.) औरंगजेब - दिल्लीचा सम्राट, त्याचा (शिवाजी राजांचा) सगळ्यात मोठा शत्रू ज्याने तब्ब्ल वर्ष दख्खन मध्ये शिवाजी महाराजांना नेस्तनाबूत करण्यात घालवली तो शिवाजी महाराजांबद्दल असं म्हणतो कि -
"तो उत्तम नेता होता, आणि त्याच्यातच फक्त अशी क्षमता होती कि नवीन राज्य बनवू शकेल जेव्हा कि मी सतत भारतातली प्राचीन सार्वभौमत्व असलेली स्थान नष्ट करत होतो. माझं सैन्य त्याच्या विरुद्ध (शिवाजी राजांविरुद्ध) एकोणीस वर्ष लढत होत पण त्याच राज्य स्टेट वाढतच गेलं. (म्हणजेच माझे - औरंगजेबाचे प्रयत्न उपडी घड्यावर पडलेल्या पाण्याप्रमाणे व्यर्थ गेले).
********************************************************************
पुढे संभाजी महाराजांच्या निधनानंतर तर आपल्या मराठ्यांनी औरंगजेबाला अक्षरश: भिकेला लावलं. पण बहुधा हे त्याला कळलं असावं हे त्याच्या वरच्या गोष्टींवरून दिसून येत.
![]() |
| भवानी तलवारीचं पुस्तकात दिलेलं चित्र |
- केतन सावंत
=========================================================================
(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)




0 Comments