सध्याच्या असलेल्या भारताचे मूलनिवासी असलेल्या सनातन धार्मिकांनी बांधलेली अनेक देवळं परकीय आक्रमकांनी तोडली. अक्षरश ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. त्यासाठी स्वतःला बिरुद लावून घेतली. बुतशिकन आणि कुफ्रशिकन.
हजारोंच्या संख्येने असलेली हिंदूंची देवळं नामशेष झाली तर काहींना उध्वस्त करून त्याजागी मशिदी बांधण्यात आल्या. किती म्हणून मशिदी बांधल्या. किती म्हणून आराध्यांच्या पवित्र धार्मिक स्थळांवर हातोडा चालला. काशीविश्वेश्वर, सोमनाथ... कितीएक मुर्त्या फोडल्या. यवनांची धाड आली कि मूर्ती उचलावी आणि लपवून ठेवावी हे नित्याच झालं होत पण ह्यास विरोध झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. त्यांनी कधीच नवीन मशिदी बांधल्या नाहीत. पण पूर्वापार चालत असलेल्या मशिदीची वर्षासन तशीच चालू ठेवली. उलट आपली देवल तोडून मशीद बांधली तिथे पुन्हा ती मशीद तोडून देवळ बांधायला लावली. (उदाहरणार्थ - सपेत्तीपेरुमल इथे असलेली देवळ)
आता एक पाहूया ते आपल्या महाराष्ट्रातच पुण्याजवळ घडलेली गोष्ट. पुणे जिल्ह्यात घोडे गावी असलेल्या मशिदीत एक फारसी आहे. त्यात ज्याने तो खोदवला तोच म्हणतो कि हि मशीद बांधण्यासाठी मी ३० (तीस) देवळ तोडली. म्हणजे किती उघडपणे आपल्या धर्माचा वृथा अभिमान बाळगून हे लोक हिंदू धर्माला हीन समजत होते आणि त्याच्या नाशासाठी सतत प्रयत्नशील होते. लेख खोदविणाऱ्याला घोडनदी हे नाव आवडत नसल्याने वा दुसऱ्याकाही कारणाने त्याने त्या नदीला खराब हे नाव दिले आणि त्या जागेला खराबाबाद. फारसी मध्ये खर म्हणजे गाढव आणि खराब म्हणजे गाढवाचे मूत. ह्या नदीस घोडनदी पेक्षा हि गाढवाच्या मुताची नदी म्हणून त्या गावाला खराबाबाद हे नाव दिले.
संदर्भ - मुस्लमानकालीन महाराष्ट्र - ग ह खरे - पृष्ठ - ४४
=========================================================================
(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

2 Comments
Congrats your blog is very well written and for this your hardwork can be seen. Keep writing abd showing us our Heritage
ReplyDeleteThank you so much
ReplyDelete