चुकवू नये असे काही

        पुस्तक वाचून कुणाचं भलं झालय का अस कोणी विचारलं, तर मी ठामपणे सांगेन कि माझं झालय, ह्या एका पुस्तकाने माझं भल झालय अगदी १०८%. 

                                       


                 एक चाळीशी पार केलेला डॉक्टर इतक्या सहज गुंडाना मारू शकतो आणि एका माहेरवाशिणीची सुटका करून तिच्या सासरच्या मंडळींना समजावू शकतो हे कस काय होत? जवळपास तीनशे किलो वजन सहज उचलणारे ह्या डॉक्टरांना त्यांच्या इच्छेविरुद्ध एक तसूभरही हलवू शकत नाही हे कस काय होत? पहिल्याच भेटीत प्रत्येकाला आपलंस करणारा आणि प्रत्येकक्षणी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे हे डॉक्टर नक्कीच वेगळे आहेत. अगदी बालवयापासून आपलं वेगळेपण आपोआप दिसून येत होत. तिसरीमधला मुलगा हिमालयाची हाक सारखा निबंध लिहितो. शाळेतल्या मस्तीकरण्याच्या वयात देखील मैत्रिणीला फी माफीची गरज आहे हा 'मॅच्युअर्डनेस ' त्यात त्यावेळीही होता.

       मेथी गावी मेडिकल कॅम्प चालू करणारे बापू, दिलासा मेडिकल ट्रस्टची स्थापना करणारे डॉक्टर, एम डीअसणारा हा डॉक्टर किती सहज मित्रांच्या घरी जाऊन गप्पा मारतो, मित्राच्या लग्नात भटजी येऊ शकले नाही म्हणून स्वतः पौरोहित्य करून विधिवत लग्न लावणारे हे डॉक्टर वेगळेच आहेत नाही का? प्रसिद्ध नाटक मंडळ रविकिरण यांचा पहिला स्पॉन्सरर म्हणजे डॉक्टर जोशी, लोकप्रभा या प्रसिद्ध मासिकाचे संपादक श्री प्रदीप वर्मा आणि आचार्य अत्रेंच्या दैनिकात काम करणाऱ्या पुष्पाताई त्रिलोकेकर यासारख्या व्यासंग असलेल्या व्यक्ती जेव्हा मानतात कि बापू कुठल्याही क्षेत्रांत अव्वलच असतील तेव्हा डॉक्टर जोशींचं वेगळेपण अधोरेखित होत.



    लौकिकार्थाने १९९६ पासून प्रवचन सुरु झाली तरी बापू तेच सांगतात जे आधी सांगायचे फक्त आता ते आपल्याला पटायला लागलं असं डॉ नर्सिकर जे बापूंचे कॉलेजपासूनचे सहाध्यायी होते ते सांगतात. घरातूनच डॉक्टर जोशींना बापू म्हणायचे त्यामुळे पुढेही सगळे 'बापू' म्हणतात.

२००६ सालीचं तिसरं महायुद्ध सारखं पुस्तक लिहून जगाला पुढे येऊ घातलेल्या युद्धाची जाणीव करून दिली होती.  श्रीमद्पुरुषार्थ सारखे ग्रंथ आणि इतरही लिखाण वाचलं कि जाणवत हि व्यक्ती माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि एकूणच ह्या राष्ट्रासाठी हा  प्रगतीचा मार्ग आहे आणि ते बापू त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून देतात मग तो तेरा कलमी कार्यक्रम असो, कोल्हापूर वैद्यकीय शिबीर असो वा अजून कितीतरी गोष्टी.

    बापूंचं देवत्व किंवा मानवत्व जे ज्याचं त्याने ठरवायचं आहे कारण बापूंकडे कुठलीच गोष्ट कंपलसरी नाही आणि ह्यांचं बापूंबद्दल आणि त्यांच्या लहानपणापासूनचे असे अनेक किस्से जाणून घ्यायचे असतील तर "मी पाहिलेला बापू" हे बापुना जवळून पाहणाऱ्या व्यक्ती जसे कि बापूंचे वर्गमित्र, शिक्षक, बापूंच्या सहवासात आलेल्या व्यक्ती ह्यांनी लिहिलेले हे किस्से आहेत अगदी कुठलाही आडपडदा न ठेवता वाचायलाच हवं.

    एकच विनंती आहे कि एकवेळ बाकी नाही वाचलत तरी चालेल पण आयुष्यात एकदा तरी हे पुस्तक वाचाच वाचा कारण हे तुमच्या आमच्यातले डॉक्टर कसे वेगळे आहेत आणि तरीही आपलेच आहेत हे कळायलाच हवं आणि वाचायचं राहील तर तुम्ही नक्कीच काहीतरी मिस करताय हे खात्रीने सांगू शकतो.

        पंचपक्वान्नांनी ताट भरलेले असेल पण कशातच मीठ नसेल तसच तुम्ही सगळं काही वाचलं पण हे पुस्तक वाचलं नसेल तर बिन मिठाच्या जेवणासारखी गत होईल .

जेन ऑस्टेन म्हणतात तस माझं ह्या पुस्तकाबाबत झालय - 
" If a book is well written, I always find it too short "

    मी मार्केटिंग करत नाहीय पण जसा मी गो नी दांडेकरांनी पुस्तक वाचून त्यांच्या लिखाणात वेडा झालो तसच हे पुस्तक वाचून झालय. तुमचा अभिप्राय नक्की कळवा पण पुस्तक वाचल्यावरच!

पुस्तक खरेदी करायला लिंक खाली दिली आहे. 

https://www.e-aanjaneya.com/product/mi-pahilela-bapu-marathi/

    



- केतन सावंत

Post a Comment

0 Comments