छावा च्या निमित्ताने

                                              
                                                ll श्री शंभो शिव जातस्य मुद्रा द्यौरिव राजते

                                                 दं कस्यै विनोलेखा वर्तते कस्य नोपरी  ll 


    सध्या दणक्यात सुरु असलेल्या आणि तमाम रयतेने डोक्यावर उचलून धरलेला सिनेमा म्हणजे 'छावा'. बुऱ्हाणपूरच्या लढाई पासून सुरु झालेला सिनेमा जेव्हा शेवटाला येतो तेव्हा आपल्या नकळत आपले डोळे भरून येतात. राग, द्वेष, चीड आणि प्रचंड दुःख यातना बाहेर घेऊन निशब्द बाहेर पडतो. 

    आणि आपण आज हिंदू म्हणून जगतोय त्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय सोसलय, भोगलय आणि काय बलिदान दिलंय हे लक्षात राहण्यासाठी तरी हा सिनेमा बघाच.

आणि ही जाणीव कायम राहायला हवी.

खरतर सिनेमा मध्ये जो अंत दाखवला आहे तो सत्याच्या फक्त १०% म्हणू शकतो. चाळीस दिवस ह्या मराठ्यांच्या छत्रपतींचे किती भयंकर हाल केले असतील ह्याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. 'छावा' आणि 'संभाजी' ह्या दोन कादंबऱ्यांमुळे छत्रपती संभाजी महाराज वाचून आपल्याला माहिती होते पण पडद्यावर जेव्हा सिनेमा पहिला तेव्हा खरतर आपल्याला त्याची भीषणता समजली.


आता सिनेमा आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात फिरत राहतो आणि बरेच प्रश्न आपल्याला पडत राहतात. हे खरच झालं होत का? ते पळू शकले नसते का? त्यांनी प्रयत्न केला होता का पळून जाण्याचा? शिर्के खरंच फितूर होते का? मग पुढचा प्रश्न येतो कि खरा इतिहास कुठे वाचायला मिळेल? मला सत्य जाणून घ्यायचं आहे. ह्या अशा बऱ्याच प्रश्नाचा उहापोह सध्या सोशल मीडियावर चालू आहे.

मुळात कादंबरी हा पूर्ण इतिहास नव्हे. ते सत्याच्या जवळ जाणार साधन आहे. मग खरा इतिहास कुठला तर समकालीन कागदपत्र, बखरी हे आणि अश्या गोष्टीच्या अभ्यासातून आपला स्वतःचा झालेला अभ्यास. 

इतिहासात आज एखादा नवीन पुरावा/कागद किंवा समकालीन काही मिळाला तर तो बाकीच्या पुराव्यांसोबत ताडून पाहून आणि त्या कसोट्यांवर जर खरा उतरला तर नक्कीच तो ग्राह्य धरला जातो.


  आता प्रश्न येतो कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर तर बरच साहित्य उपलब्ध आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल फार कमी साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे काय वाचायचं हा प्रश्न आहे. तर अभ्यासपूर्ण  लिहून प्रकाशित झालेला संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ. कमल गोखले यांनी लिहिलेल शिवपुत्र संभाजी हे पुस्तक/संदर्भ ग्रंथ.

ह्यात राजांच्या संपूर्ण जीवन चरित्राचा आढावा घेतला आहे. हे पुस्तक संग्रही ठेवा आणि पूर्ण वाचा.


                                                          पुस्तक घेण्यासाठी इथे क्लिक करा


© केतन सावंत 


Post a Comment

0 Comments