करारा जबाब मिलेगा!


पहलगाम — निसर्गसौंदर्यापासून नरसंहारापर्यंत

        आम्हाला शाळेत असताना धडा होता या पहलगामवर. आज अचानक आठवला कारण या नितांत सुंदर जागेला रक्ताने माखलं ते नीच दहशतवाद्यांनी. जर कुणी म्हणत असेल की दहशतवाद्यांचा कुठलाच धर्म नसतो तर आज इथे घडलेल्या नरसंहाराबद्दल उपस्थित असणाऱ्या लोकांना विचारा, ज्यांचे नातेवाईक होते त्यांना विचारा.

Pahalgam



"तुम्ही हिंदू आहात का?" — एका प्रश्नावर मृत्यू ठरतो

हे फक्त एक हल्ला नव्हता. हा निव्वळ दहशत नव्हती. हा होता धर्माच्या नावावर चालवलेला नरसंहार.
दहशतवाद्यांनी विचारलं —
"तुम्ही हिंदू आहात का?"
कागदपत्रं तपासली गेली. कपडे उतरवून ‘सुंता’ तपासण्यात आली. आणि जेव्हा खात्री झाली की समोरचा काफिर आहे, तेव्हा थेट गोळी झाडण्यात आली.
नुकत्याच लग्न झालेल्या एका जोडप्याचा संसार सुरू होण्याआधीच संपवण्यात आला — केवळ त्यांच्या धर्मामुळे.




        आज बऱ्याच वर्षांनी अजून एक घटना घडली. कलम ३७० हटवल्यावर उदयाला आलेल्या संघटनेने ह्याची जबाबदारी घेतली आहे. हीच संघटना लष्कर ए तोयबासाठी भरती करते. २०२४ मध्ये देखील घडलेल्या एका हल्ल्यामागे हीच संघटना होती.

ही दहशतवाद्यांची जळजळ फक्त काश्मीरसाठी मर्यादित नाही तर जर तुम्ही हिंदू आहात तर तुम्ही कत्तल करण्यायोग्य आहात ही त्या नीच लोकांची धारणा आहे.

दहशतवाद कसा ठेचायचा? 

१.तर ज्याप्रकारे पायाखाली आलेला किडा चिरडतो आपण तसा चिरडायचा. 

२.मारल्यावर थेट आगीत जाळून टाकायचं (मग दहशतवादाला कुठला रंग असतो ते कळेल काही लोकांना) 

३.एकाही दहशतवाद्याची बॉडी त्याच्या घरच्याना ओळख पटली तरी दिली जाऊ नये.

आज 'आपले' हकनाक बळी गेले. पण आपण ही घटना विसरणार नाही आणि ह्याची जबर किंमत ह्या लोकांना भोगायला लागेल आणि त्यासाठी आपण आपल्या सरकारच्यापाठी ठामपणे उभे राहूया. 

जाती पाती सोडून आता आपण हिंदू म्हणून एक आलो पाहिजे. मी मराठा, तू ब्राह्मण, मी आगरी तू कोळी हे आपण करत बसलो आहोत आणि ते फक्त तुम्ही हिंदू आहात का ह्या एका प्रश्नावर आपल्याला गोळ्या घालतायत.

आज भारताने कठोर पावलं उचलायला हवीत. याबाबत प्राच्यविद्या अभ्यासक डॉ अनिरुद्ध जोशी यांनी २०१९ साली लिहिलेल्या "अटॅक इज द बेस्ट डिफेन्स" ह्या लेखाची आठवण झाली. आता थेट पाकिस्तानमध्ये घुसून बलुचिस्तान घ्यावा आणि पाकिस्तानचे चार तुकडे करावेत.

उद्या ही परिस्थिती आपल्या दारावर आली तर आपण काय उत्तर देणार हे आताच विचार करून ठेवा.

हा देश शेजार धर्मही पाळतो आणि सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट हल्ला करणेही जाणतो. माझा माझ्या देशावर विश्वास आहे, ह्या सरकारवर माझा विश्वास आहे आणि ह्या दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारावे माझा पूर्ण पाठिंबा आहे. जय हिंद! जय भारत!



© केतन सावंत 

Post a Comment

2 Comments

  1. अगदी समर्पक आणि मोजक्या शब्दात परखड विचार मांडले आहेत... जशास तसेच उत्तर दिले पाहिजे ते ही कसलीही दयामाया न दाखविता

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद

      Delete