लोक काय म्हणतील

                          तसा आजकाल  प्रत्येकजण technosavy  होतोय पण आपल्या माणसांपासून लाम्ब जातोय. technosavy  होण  हे आजच्या जगात नितांत गरजेच आहे पण त्यामुळे आपल्या रोजच्या नात्यात दुरावा नाही येणार न ह्याची पण काळजी तितकीच घ्यायला हवी, कस असत  ना की आपण एखाद्या गोष्टीच्या इतक  आहारी जातो की आपल्याला कळतच नाही की आपण  काय करतोय.
                                आपल्या ह्या सुखवस्तु जगण्यामध्ये आपणच अडचणी आणतो,आणि पर्यायाने दुरावा येतो, गप्पा आजकाल कोणीच मारत नाही की कट्ट्यावर सुद्धा कोण दिसत नाही. पण व्हॉट्स  एप  वर मात्र रोज एक नविन ग्रुप बनत  असतो आणि रोज कोणीतरी काही फालतू पोस्ट टाकत  असतो. आपल्याला खरच ह्याची गरज आहे का? असल्या फालतू पोस्ट वाचण्याची आणि शेयर करण्याची. नाही माझा कशालाच विरोध नाही पण आपण  काय करतोय आणि आपला अमूल्य वेळ कुठे फुकट घालवतोय ह्याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असायलाच हवी.
                               समाज बदलतोय ……… समाज बदलतोय ………समाज बदलतोय ………अस रोज कोण तरी  बोलत  असत, पण समाज खरच बदलतोय तर मग आपण का नाही बदलत? आपल घोड़ कुठे अडत  माहितीय ? लोक काय म्हणतील , पण वेळ पडल्यावर सोबतीला आणि मदतीला हे "लोक" नसतात
             


                           वास्तविक पाहता माझा कुणा एकावर  रोख किंवा रोष नाही पण खंत  मात्र नक्की आहे की अजूनही कितीतरी जण असेच वैद्न्यानिक जगतापासून आपण  जितके लांब  तितके बरे ह्या चौकटीत जगतात परंतु ह्या बदलणाऱ्या समाजा  मध्ये जर टिकून रहायच  असेल तर ही "चौकट" सोडून बाहेर  पडायलाच हव. आणि म्हणून प्रत्येकाने अगदी तोड़क मोडक  का होईना पण ह्या बदलणाऱ्या काळासोबत चालायला ह्व. छोटासा एक किस्सा सांगतो माझ्या ऑफिस मधे एक सर आहेत त्यांच्या कड़े चांगला स्मार्टफोन आहे. सहज त्यांच्याशी बोल्ट होतो तेव्हा ते बोलले की "अरे माझी मुलगी हा फ़ोन जास्त  चांगला वापरते अजुन शाळेत जाते पण माझ्या पेक्षाही तिला  ह्यातल जास्त कळत." . ते सहज बोलून गेले पण माझ्या मनात मात्र हे कुठेतरी सहजच लागून गेल. ही व्यक्ति मोठ्या हुद्द्यावर आणि तरी  एक क्षुल्लक स्मार्टफोन वापरण्यात मात्र "घाबरते". ही भीती जायला हवी. कशी ? इथे सुद्धा मदतीला ही टेक्नोलॉजी येते.  तर कस?समजा मला नवीन एखादी गोष्ट शिकायची आहे तर यू ट्यूब वार जाऊन सगळे विडियो बघून अपन शिकु शकतो पण मेहनत मात्र आपल्यालाच करावी लागणार.
                                           बघा पटतय  का ते?

Post a Comment

0 Comments