इनवेस्टमेंट फॉर लाइफ

                               
                                            आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणापासून एक भजन नेहमी ऐकलेल असत "खेळ  मांडियेला वाळवंटी ठायी"… आठवल? नक्कीच आठवल असेल… आज पुन्हा मला "अनिरुद्धाज इंस्टिट्यूट ऑफ़ स्पोर्ट्स एण्ड बोन्साई स्पोर्ट्स" बद्द्ल  सांगायचय. आता तुम्ही म्हणाल की त्या भजनाचा आणि खेळाचा काय संबंध? पण आपण एक विसरतो की ते वारकरी त्या  विठुरायाच्या वारीमध्ये जे "रिंगण"घालतात तो सुद्धा एक प्रकारचा खेळच  आहे.

                   आपल्या प्रत्येक गोष्टीचा मूळ  गाभा हा "भक्ति" आहे, मग ते AADM(अनिरुद्धाज अकेडेमी ऑफ़ डिझास्टरमैनेजमेंट) असो किंवा AIGV(अनिरुद्धाज इंस्टिट्यूट ऑफ़ ग्रामविकास) त्याचप्रमाणे ह्या इस्टीट्यूट चा मूळ  गाभा देखील "भक्ति"हाच आहे आणि ह्या इंस्टीट्यूटचे मुख्य स्वत: "बापू" आहेत.
               
                         रामराज्याच्या प्रवचनाच्या वेळेस बापुनी ह्या इंस्टीट्यूट ची घोषणा केली होती. आपल्या सगळ्यांना ठाऊक असेलच की आपल्याकडे कोणतीही गोष्ट complusory  नाहीय त्याचप्रमाणे ही देखील नाहि… फक्त त्याची प्रेमळ इच्छा असते की माझ्या बाळाच आयुष्य सुंदर व्हाव आणि त्याच ब्रीद हेच आहे की "अवघाची संसार सुखाचा करिन आनंदे भरिन तिन्ही लोक" मग त्याची ही इच्छा आपण आद्न्या म्हणून तीच पालन केल तर? सद्गुरु आद्न्या पालनाच महत्त्व आपण श्री साईसच्चरितात वाचतो. आणि त्यामुळे त्या भक्ताना होणारे फायदे पण बघतो आणि अजुन एक गोष्ट ती म्हणजे  आपण खेळायला जातो ही आपली एक इन्वेंस्टमेंट आहे जी आपल आयुष्य सुंदर बनवणार आहे आणि बनवत आहे कस ?  तर…

१) आपण खेळायला गेलो तर साहजिकच सकाळी कोवळया उन्हात खेळल्याने "ड " जीवनसत्व मिळणार आहे.
२) नियमित खेळायला येण्यामुळे आपोआपच "सद्गुरु आद्न्या पालन"होणार आहे.
३) मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे डिप्रेशन, टेंशन ह्या सगळ्यापासून आपण दूर राहणार.
४) सांघिक भावना वाढीस लागणार.
५) अपयश पचवायची ताकद मिळणार .
६) शरीर सुदृढ़ राहत आणि आपण उत्तम आरोग्याचे धनी होणार.
७) बापू आपल्यासाठी रामराज्य आणतोय मग त्याच्या ह्या गोवर्धनाला आपण ही एक काठी लावतोय.
८) सगळ्यात महत्त्वाच "मी  जे काही करतोय त्यामुळे माझ्या बापूला आनंद झाला पाहिजे"हा आपला निश्चय दृढ़ होतो
                   
                                आणि ह्या स्पोर्ट्स इंस्टीट्यूटचा भाग झाल्याने माझ्या हातून किती काय काय तो बापू अगदी सहज करून घेतोय; एका अभंगात पिपादादा म्हणतात ना "उठून बसण्या दमलो नाही हीच काय ती  सेवा घडली".... ही सेवा तो करतोय आपली आपल्याला फ़क्त दर रविवारी सकाळी ७ ते ९ ह्या वेळात फ़क्त खेळायचय अगदी मनसोक्त…
                       
                                    तर मग झाली ना इन्वेस्टमेंट? आता पासूनच इन्वेस्ट करा आठवड्यातला एक दिवस फ़क्त दोन तास आणि बघा पुढच्या सुंदर आयुष्याची पहाट.....



Post a Comment

2 Comments