आयुष्याच्या पायाखाली

आयुष्याच्या पायाखाली मी  रोज बसतो
संथपणे  जन्माची उत्तर लिहित दिसरात
उरत नाही काहीच मग
सोडून माझे रीते हात

राग येतो इतका कधी  कधी  आयुष्याचा
वाटत त्याच्या जोरात कानफटात  मारावी
मग सरल होईल सुतासारख
आणि उत्तरही डील एखाद्या निष्णाता सारखी

हात.…पाय.…क़ान.....डोळे
सगळेच बधिरतेचे भक्त होतात
नशीब नावाच्या देवाला
अद्न्यानाचा नैवेद्य दाखवतात

मग वाटू  लागत रस्ताच खचून जावा 
म्हणजे आयुष्याचा पायही ठरणार नाही 
आणि जन्माची उत्तर लिहायला 
मग मीही बसणार नाही 

- केतनसिंह सावंत 



Post a Comment

4 Comments

  1. अम्बद्न्य केतनसिंह....सुंदर . वास्तवदर्शी कविता ......

    रित्या हातातली भरलेली ओंजळ ...बघ दिसतेय का?
    कदाचित जन्माची उत्तर साचली असतील त्यातच....
    हो पण...
    ठरवल्या प्रमाण आयुष्याच्या कानफटात मारायला नको विसरुस बर..
    कदाचित हमरस्त्यावर पोहोचवणारी पाउलवाट दडली असेल त्यातच .!


    ReplyDelete