भेट






तुझ्या गाण्यामध्ये अजुनसुद्धा
पूर्वीसारखा 'सुर' लागत नाही
माझी गझल लिहून पूर्ण होते
तरी तुझा 'तानपुरा' लागत नाही
'सा' तर परकाच झालाय बहुधा
समे वर शेवटची कधी आलीस
मला देखील आठवत नाही
शब्द तेच आहेत
तानपुरा, बैठक वगैरे सार काही तेच आहेत
तसेच आहेत....
आता फ़क्त एक कर....
"तुझ्या गाण्याआधी आपल्या विस्मरणात गेलेल्या 
भेटींच स्मरण कर"

- केतन सावंत

Post a Comment

0 Comments