छळतात भास् तुझे
स्वप्नी... जागेपणी... अबोलपणी...
उधळून मुक्तपणे तुझा गंध
असा येतो श्वासांवर आरूढ़ होऊन
आठवण तुझी करण्यासाठी
तेव्हा छळतात भास् तुझे अन कविता होते .....
सोबती अनेक आठवणी
झोके घेत झूलत राहतात
तुझ्या माझ्या नशिबांच्या रेशांवर...
त्याना तू "आठ्या" म्हणतेस
आणि मी "ओढ" म्हणतो
तेव्हा छळतात भास् तुझे अन कविता होते .....
भिजलेल्या वाटेला तू "चिखल"म्हणतेस
आणि मी त्याच वाटेला "पाऊस" म्हणतो
एवढाच काय तो फरक
बाकी सगळ आपापल्या जागी बरोबर आहे
पण स्वप्नी.. जागेपणी... अबोलपणी
छळतात भास् तुझे अन कविता होते....
- केतन सावंत

1 Comments
khup chan
ReplyDelete