ह्या पुस्तकाबद्दल काय बोलू अस झालंय. सुरुवातीला बऱ्याच जणांच्या सांगण्यावरून हे पुस्तक घ्यायचं - नाही घ्यायचं असं चालू होत. पण नाही म्हणता म्हणता हे पुस्तक घेतलंच. पुस्तक घरी आणल्यापासून अक्षरश: झपाटल्यासारखं वाचून काढलं. खरतर हे पुस्तक एकदा वाचायला घेतलं कि खाली ठेवावंसं वाटत नाही.
'नॉट विदाउट माय डॉटर' बेटी मेहमुदी ह्यांनी लिहिलेलं हे आत्मचरित्र. त्या कशाप्रकारे इराण मध्ये अडकल्या आणि कसा संघर्ष करून अमेरीकेत आल्या ह्याची संघर्षमय कहाणी म्हणजे हे पुस्तक. ह्यात कुठेही अलंकारिक भाषा नाही. तिच्या नवऱ्याने तिचा आणि तिच्या लहानग्या मुलीचा केलेला अनन्वित छळ. तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. पण कितीही झालं तरी देवा वरची श्रद्धा तिला ह्या सगळ्यातून कशी बाहेर काढते आणि तिच्या घरी सुखरूप पोहोचवते हे वाचन करणं नक्कीच चांगलं आहे. ह्या कथेवर १९९१ साली सिनेमा सुद्धा आला पण शेवटी वेळेअभावी काही गोष्टी दाखवल्या नाहीत. म्हणून हे पुस्तक वाचाच आणि आवर्जून तुमच्या संग्रही ठेवा.
तुम्हाला कधीही हरल्यासारखं वाटेल, निराश असाल, काय चालू आहे आयुष्यात असं वाटत असेल तेव्हा हे पुस्तक वाचा. तुम्हाला प्रेरणा मिळेल. पुस्तकाच्या सुरुवातीपासून आपण लेखिकेबरोबर प्रवास करू लागतो. तिच्या नवऱ्याने केलेला छळ पाहून त्याला उभा चिरावा असं वाटत. इराण सारख्या मुस्लिम बहुल देशात स्त्रियांना होणाऱ्या अपमान आणि इतर जाचाना देखील लेखिकेने वाचा फोडली आहे.
एकदा तरी हे पुस्तक वाचाच एवढच सांगेन. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. खाली दिलेल्या चित्रावर क्लिक करून तुम्ही ते विकत घेऊ शकता.
![]() |
| मराठी |
![]() |
| इंग्रजी |
- केतन सावंत
=========================================================================
(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)


0 Comments