तुला काळजी माझी हे मी उमगलो...






हरि ॐ. आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगू इच्छितो. टी.वाय पूर्ण झाल्यावर मी नोकरीच्या शोधात होतो. तेव्हा एका बापुभक्त मित्राच्या साङ्गन्यावरुन मला एक कोल सेंटर (call centre) मधे जॉब मिलाला. दि. 25 जुलै 2012 या दिवशी मी जॉइन झालो.त्यावेळी त्यानी मला काही कागदपत्र जमा करायला सांगितली.आणि ऑफिस होते सी.एस.टी येथे.त्यामुले मी तिथल्याच एका दुकानात झेरोक्स साठी गेलो. 10 वी 12 वी च्या मार्कशीट ची झेरोक्स काढल्यावर मी ओळख पात्रत म्हणून "आधार कार्ड" ची झेरोक्स काढली. आणि मी पुन्हा ऑफिस मधे गेलो. त्यानंतर काम चालु झाल. अस करता करता 6 महिने गेले आणि जानेवारी महिना उजाडला. तोपर्यंत माझा प्रोबेशन पीरियड संपल्यामुले मी नोकरी सोडून 10-12 दिवस झाले असतील.तेव्हा दुसर्या एका कामासाठी मला आधार कार्ड हव होत.म्हणून शोधाशोध सुरु झाली. कोलेजात असताना मी आधार कार्ड नेहमी माझ्या जवळ ठेवत असे म्हणून तय बैग मधे पं बघितल तरी सापडल नाही. शेवटी ऑनलाइन आधार कार्ड मिलवायच ठरवल. पण काही कारणाने ते लाम्बत होत. साइबर काफे अगदी बाजुला. तरी पावल वळत नव्हती.का? हे बापुलाच थाऊक.मी बापूला म्हणालो तुझी इच्छा.आणि साधारण 10-15 दिवसानी दुपारी घरी एक पत्र आल. ज्यात लिहील होत की "आपका आधार कार्ड हमारे पास है कृपया  आके ले जाईये" आणि सोबत दुकानवाल्याच कार्ड होत. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
       6 महिन्यांपूर्वी झेरोक्स दुकानात विसरलेलो आधार कार्ड त्या दूकान वाल्याने जपून ठेवल होत. नाही माझ्या बापूने त्याला तस करायला भाग पाडल. आणि मी जाऊन त्या दूकान वाल्याला भेटलो कार्ड घेतल म्हणालो हे 50₹ ठेवा. तर घ्यायला तयार नाही मग मी आपल्या संस्थेत ते पेटीत टाकले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तय सहा महिन्यात मला  आधार कार्ड ची गरज लागली नाही. आणि जेव्हा गरज लागली तेव्हा बापूने मला सगळ अगदी सहज करून दिल. बापू तू खरच ग्रेट आहेस.
I love uuuuuu my DAD......

Post a Comment

1 Comments