हरलेला देव बाप्पा

हरलेला देव बाप्पा 

पप्पा  बघ  कोपऱ्यात  बसून राहतो 
दादा कसा  आता उपाशी निजतो 
चार दिवस झाले आता तरी सांग 
लपली  कुठे खेळताना तिचा लागला नाही थांग  
उलटून गेली रात्र मम्मी आली का नाही रे 
सांग बाप्पा मम्मी माझी कुठे हरवली का रे 


कुशीमध्ये घेऊन मला का 
असा रडत बसतो पप्पा 
सांग त्याला केला नाही 
मम्मीचा अजून  मी  "थप्पा "
इवल्या माझ्या गालांवर 
बघ कसा ओली पापी देतो 
मिठी  मारून कशी मला 
हळूच ओले डोळे  पुसतो 
विचारले तर तोंडावर ठेऊन बोट 
मला  गप्प करे 
सांग बाप्पा मम्मी माझी कुठे हरवली का रे


आजी बोल्ली  "ती " म्हणे 
तुझ्याघरी गेली 
विचार  तिला असा खेळ 
का सोडून तू आली 
आता मला वरण भात 
कोण भरवणार सांग 
घेऊन का तू गेलास 
तिला तुझ्याकडे एवढ्या लांब  
आजोबा बोल्ले तो बघ तारा 
तीच तुझी मम्मी 
सगळ दिलस बाप्पा तू पण 
दिली नाहीस मम्मी 
एवढच कर बाप्पा तीला सुखामधे ठेव रे 
एवढच कर बाप्पा तीला सुखामधे ठेव रे


- केतनसिंह सावंत 









Post a Comment

2 Comments