मोदींना झालंय तरी काय? मोदी घाबरले! या आणि अशा अनेक बातम्या आपण सकाळपासून वाचतोय. मोदी आणि इंदिरा गांधींची तुलना चालू झाली आहे. स्व पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी जी संसदेत म्हणाले होते वो तो साक्षात दुर्गा है!
आता तुलना का होतेय ते समजून घेऊ. १९७१ च्या युद्धानंतर आज २०२५ साली आपल्याला ही संधी लाभली होती. ती युद्धात लाभलेली संधी होती आणि इथे कुठेही युद्ध घोषित न होता फक्त प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात ही संधी उपलब्ध झाली होती.
१९७१ युद्धात सापडलेली तब्बल ९३,००० कैदी आपण तीन वर्षात सोडून दिले होते पण त्याच वेळी आपण लाहोर पर्यंत जिंकलेला भाग देखील पाकिस्तानला परत दिला. तेव्हाच का नाही बलुचिस्तान, आजचा PoK भारतात सामील करून घेतला? याची उत्तर मोदींना आज नाव ठेवणाऱ्या सगळ्यांनी शोधायची आहेत. इथे वाचू शकता
आपण पाकिस्तानचे किती सैनिक मारले ह्यावर भारताच्या वायुप्रमुखांनी उत्तर देताना स्पष्टपणे सांगितलं - किती मेले हे मोजणं त्याचं काम आहे आमचं काम फक्त अचूक हल्ला करण जो आम्ही केलेला आहे. (आजच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या प्रेस ब्रीफिंग मधली गोष्ट)
आपण अमेरिकेच्या दबावाला बळी पडलो का? नाही. आपण पाकिस्तानची सर्व प्रमुख शहर, सैन्याची मुख्यालय, एअर डिफेन्स सिस्टीम हे सगळ अक्षरशः धुळीला मिळवलं आहे. जवळपास सर्वच एअर बेस उडवले आहेत. ड्रोन आणि फायटर जेट हे ही उडवले आहेत आणि ह्याची कबुली खुद्द पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाने दिली आहे.
आता जरा लक्ष देऊन वाचा. कारण पुढचा घटनाक्रम महत्वाचा आहे.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की काही दिवसापूर्वीच एका परदेशी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी कबुली दिली की गेली काही दशक ते त्यांच्या देशात दहशतवादी पोसत आहेत आणि ते देखील अमेरिकेसाठी. इथे बघू शकता
आपण पाकिस्तानची दाणादाण उडवलेली असताना भिकेला लागलेली पाकिस्तानने IMF कडे पैशासाठी भीक मागितली ज्यावर हा पैसा दहशतवादासाठी वापरला जाऊ शकतो असा आरोप भारताने केला तरी त्यांनी जवळपास १ बिलियन अमेरिकी डॉलरच सहाय्य दिलं. ह्याच IMF मध्ये अमेरिकेचा सहभाग १७% आहे. इथे वाचू शकता
सुरुवातीला हल्ला झाला तेव्हा ह्याच ट्रम्पच्या अधिकाऱ्याने ते लढतात तर लढू दे म्हणून भाष्य केलं होत पण अचानक ते युद्धबंदी व्हावी ह्या मतावर आले. कारण काय? इथे वाचू शकता
आपण पाकिस्तानच्या सोबत झालेल्या हवाई लढतीत त्यांचे अत्याधुनिक एफ - १६ पाडले ह्याच्या बातम्या संपूर्ण जगभर गाजल्या. बर ही फायटर विमान त्यांना पुरवली ती LockheedMartin ह्या अमेरिकी कंपनीने.
बालाकोट हल्ल्यानंतर आपण आपल्या जुन्या मिग २९ ने त्यांची एफ-१६ पाडली होती तेव्हा देखील अशीच त्यांची नाचक्की झाली होती. इथे वाचू शकता
युद्ध सुरू व्हायच्या काही दिवस आधीच अमेरिकेकडून पाकिस्तानला काही बिलियन डॉलरच अर्थ सहाय्य आलं? का? कारण अमेरिका हा देशच असा आहे की जर जगभरात युद्धच झालं नाही तर ह्या देशाची अर्थ व्यवस्था कोलमडून पडेल म्हणूनच रशिया समोर अगदीच नगण्य असणारा युक्रेन देश आज २ वर्ष उलटून गेली तरी लढतोय.
परराष्ट्र मंत्री श्री जयशंकर
पाकिस्तानच जगासमोर उघडा पडला आहे. भारतासकट कितीतरी देशांची डोकेदुखी असणाऱ्या हाफिज सईदच्या घरातली कितीतरी माणसं मारली त्या सगळ्यांच्या अंत्ययात्रा एकाच वेळी निघाल्या आणि त्यात सामील कोण होत? पाकिस्तान सैन्यातील अधिकारी. हे सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत. इथे वाचू शकता
हीच युद्धात न उतरणं हे पाकिस्तानच्या (कदाचित उरला तर) हितासाठी गरजेचं आहे.
तरी अजून भारतीय नौसेना ह्यात उतरली नाहीय. आणि ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच आहे. कारण महा दिवाळी अजून बाकी आहे.
पाकिस्तानला शांत झोप लागणार नाही हे मला पूर्ण ठाऊक आहे कारण त्यांची परिस्थिती प्रचंड भयानक झाली आहे आणि आपण मारून मारून अजून देशोधडीला लावलय. सोशल मीडियावर कितीही चांगलं दिसू द्या. त्यांचा सत्यानाश अटळ आहे. जरा थांबून वाट पाहूया. शेवटी खेळवून खेळवून शिकार करण्याची मजा काही वेगळीच आहे.
धन्यवाद
केतन सावंत





2 Comments
मुद्देसूद आणि परखड विवेचन.
ReplyDeleteधन्यवाद
Delete