बायको - २





खास तुमच्यासाठी "बायको" विषयावरची दूसरी कविता. 





बायको  - २  

घरातल्या आरशात, रोजच्या वरण भातात,
बेसिन मधल्या भांड्यांमधे आणि
वाळत  घातलेल्या कपड्यांमधे मला
"बायको" दिसते    

मुलांची  परीक्षा, बाजारातली काम,
महिन्याचा जिन्नस आणि
अंगणातल्या तुळशीमध्ये मला
"बायको" दिसते

तिच्या अडगळीतल्या  पदव्यांत,
संध्याकाळच्या दिव्यात आणि
वाट पाहत उभी दाराच्या चौकड़ित मला
"बायको" दिसते

एवढ सगळ करूनही माझ्या आयुष्यात
तिची गणती  कुठेच नसते पण
पाडगावकर एक तुमच्या कवितेमध्ये  एड करावस  वाटत
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे "बायको" असते
जगण्याची सुरुवात "प्रेयसी "असली तरी  शेवट मात्र
"बायको" असते








Post a Comment

6 Comments

  1. Awsomely written.. shreeram!! Waiting for more poems and designs. Ambadnya

    ReplyDelete
  2. Mast ketan.... tujha blog khup sunder design kelayas tu. sarv kavita hi apratim aahet... ambadnya... asach kayam chan chan lihat raha...

    ReplyDelete
  3. superb ketansinh... great work ..DAD bless u .:)

    ReplyDelete