![]() |
| फोटो स्रोत - गुगल |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयातला एक महत्वाचा भाग म्हणजे त्यांचं नियोजन:
१) सुरतेवर दुसऱ्यांदा स्वारी केली तेव्हा राजांनी तंबू देखील वापरले नव्हते. ते तसेच जमिनीवर बसले होते असे एका डच गुप्तहेराने सांगितले.
२) राज्याभिषेकानंतर जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहीम निघाली त्यावेळेस देखील राजांनी फक्त दोन तंबू वापरले - एक स्वतः साठी आणि दुसरा मंत्र्यांसाठी.
३) जॉन फ्रायर हा म्हणतो कि शिवाजीच्या छावणीत नर्तकी आणि वेश्या ह्यांना बंदी होती. (कुठलीही स्त्री छावणीत अथवा आपल्या सोबत सैन्यात आणण ह्याला बंदी होती)
४) मराठा सैन्याचं यश कशामुळे आहे तर - कडक शिस्त, उच्च नेतृत्व गुण, आणि राजांनी एकदा सांगितल्यावर का? विचारायचं नाही म्हणजेच डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि सोपवलेली कामगिरी पार पाडायची हि त्रिसूत्री.
आता खाली दिलेली गोष्ट वाचण थोडं मजेशीर आहे -
ह्या पुस्तकात लेख म्हणतो कि शिवाजीने त्याच्या लोकांसाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मराठा पादशाही (मराठा साम्राज्य) पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे धर्म राज्य आहे हि भावना. (इथे सगळं चांगलंच होणार) कोणावरही अन्याय होणार नाही. स्वतः पदवी धारण केली - गो ब्राम्हण प्रतिपालक (गायीचं रक्षण करणारा) आणि गायीचं रक्षण हे हिंदूंचं सर्वोच्च कार्य आहे.
राज्याचे सार ते दुर्ग - असं अमात्य आज्ञापत्रात सांगतात -
सिद्धी जौहरच्या वेढ्यातून निसटल्यावर राजांनी एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे गडांच्या संरक्षणासाठी एक भली मोठी रक्कम बाजूला करून ठेवली. जिला आपण आज Reserve Fund म्हणतो. पुढे एका ठिकाणी गडांच्या डागडुजीसाठी जवळपास एक लाख सत्तर हजार होन १,७०,०००/- रक्कम वापरली असल्याची नोंद आहे ती यादी खाली दिली आहे. (१ होन - ३/३.५ रुपये)
संदर्भ -
१) The Military System of Marathas - Surendranath Sen
=========================================================================
(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

0 Comments