सध्या आपल्याकडे "सेक्युलर" हा शब्द खूप ऐकू येतोय. त्यात छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते. त्याच बरोबर औरंगजेब कसा उदारमतवादी होता, स्वतःच्या धर्माप्रमाणेच इतर धर्मांचा आदर करणारा होता हे अगदी छातीठोकपणे सांगत फिरतात पण पुरावा मागितला कि शेपूट घालून पळत सुटतात. मागच्या भागात इथे आला देवळावर घाला आपण पाहिलं कि कशाप्रकारे आपल्या देवळावर ह्या औरंगजेबाने घाले घातले आज त्याचाच पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे.
आता खाली जे चित्र आहे ते मासिर ए आलमगीर ह्या खुद्द औरंगजेबावर त्याच्याच माणसाने लिहलेला ग्रंथातील भाग इथे देतो आहे ज्याचं भाषांतर जदुनाथ सरकार यांनी केलं आहे.
![]() |
| मासिर ए आलमगीरी पृष्ठ १२० |
ह्याचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे :-
'अबू तुरब ज्याला अंबर इथली देवळं उध्वस्त करायला पाठवलं होत तो १०ऑगस्ट रोजी दरबारात हजर झाला आणि त्याने सांगितलं कि त्याने ६६ देवळं पाडली.'
आता हिंदूंची देवळं पाडण्याचं काय कारण? काहीच नाही. फक्त आपला इस्लाम साऱ्या जगभर मानला गेला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती मुसलमान झाली पाहिजे इतका तो कट्टर आणि क्रूर धर्मवेडा होता. केशवराय इथलं देऊळ पाडल्यावर तिथल्या छोटा मोठ्या ज्या देवतांच्या मुर्त्या होत्या त्या त्याने आग्र्याला आणवल्या आणि बेगम साहिब म्हणून बांधत असलेल्या मशिदीच्या पायऱ्यांमध्ये पुरून टाकल्या.
२१ सप्टेंबर १६८१ रोजी औरंगजेब महाराष्ट्रात म्हणजेच दख्खन मध्ये यायला निघाला तेव्हा त्याने जवाहर चंद ह्या आपल्या अधिकाऱ्याला फर्मान पाठवलं कि आता अजमेर वरून आम्ही दख्खनमध्ये जायला निघतोय तेव्हा वाटेत दिसणार एकही देऊळ आमच्या दृष्टीस पडता कामा नये. काशी विश्वनाथ, जगन्नाथ, सोमनाथ, केशवराय आणि किती म्हणून नाव सांगता येतील. फक्त आपल्या क्रूर स्वार्थापोटी त्याने आपली स्वर्गाहून सुंदर अशी मंदिर पाडली. अगदी सोन, चांदी, तांब, पितळ ह्यांनी मढवलेल्या मुर्त्या त्याने फोडल्या.
आता दिवाळी जवळ आली म्हणून जाता जाता एक शेवटचं सांगतो. (अजून बरच आहे सांगण्यासारखं)
औरंगजेबाने फटाके फोडायला बंदी केली होती. हो बरोबर वाचलं तुम्ही. हे फर्मान त्याने जमाँदत उल मुल्क ह्याला एक फर्मान लिहायला सांगितलं. जे त्याने सगळ्या परगण्यांना पाठवलं ज्यात तो असं फर्मावतो को फटाके फोडायला बंदी लागू केली आहे. तसेच फुलादखानला (हा बहुतेक तोच शिवाजी महाराज आग्र्यात असताना ह्याच्याच पहाऱ्यातून पळाले होते) सांगितलं कि संपूर्ण शहरात दवंडी पिटवून फटाके फोडायला बंदी असल्याची माहिती द्यायला सांगितली. २२ नोव्हेंबर १६६५ रोजी गुजरातच्या सुभेदाराला पाठवलं होत ज्यात तो (औरंगजेब) असं म्हणतो कि हिंदू त्यांच्या श्रद्धेनुसार दिवाळी साजरी करतात. (श्रीरामांनी रावणाचा वध केला वनवासातून परत आले आणि ते वनवासातून परत आले म्हणून हिंदू दिवाळी साजरी करतो) पण आता कुणीही दिवाळी साजरी करायची नाही. खाली फर्मान देतोय...
![]() |
| हे फर्मान Aurangzeb As He Was according to Mughal Records ह्या पुस्तकातून घेतलं आहे. |
संदर्भ -
१) मासिर ए आलमगिरी
२) Aurangzeb as he was as per Mughal Records
=========================================================================
(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)


0 Comments